भाऊसाहेबांच्या स्मृतीदिनी घेण्यात आली होती स्पर्धा
प्रतिनिधी / सांगली
नूतन बुध्दिबळ मंडळाचे संस्थापक, शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी स्व. भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत भारतासह अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, इराण, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यासह अनेक देशातील 9 ग्रॅण्डमास्टर, 9 आंतर राष्ट्रीय मास्टर, 3 फिडेमास्टर, 2 कॅडेड मास्टरसह एकूण 1690 खेळाडू सहभागी झाले होते.
अखेरच्या फेरीत अर्जेटिनाचा लुकास लिआस्कोविच याने 3 हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे देश गुण
1) लुकास लिआस्कोविच अर्जेंटिना 72
2) टोर्निक सॅनिकिड्ज जॉर्जिया 71
3) मसूद मोसेडेकपूर इराण 69
4) विजूम तीवीहोडा युक्रेन 69
5) हुमायून तोफिगी इराण 69
6) रसुलोव्ह वूगार अर्मेनिया 67
7) निकोलोज पेट्रोअश्विली जॉर्जिया 63
8 कौस्तूव कुंडू कलकत्ता ,भारत 58
9) जवोहिर सिंड्रो उझबेकिस्तान 58
10) मॅग्झिम लुगोवोस्कोय रशिया 57
सांगली जिल्ह्यातील खेळाडू जीत सारडा, नंदन बजाज, रुद्र जाधव, केशव सारडा , सौमिल सारडा, श्रीधर वेल्हाळ यांना विविध वयोगटांत आणि खुल्या गटात उत्कृष्ठ खेळाडू म्हणून विशेष पारितोषिके दिली गेली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 100 खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धा नूतन बुध्दिबळ मंडळ व पुरोहित चेस ॲकॅडमीचे श्रेयस पुरोहित यांच्या सहकार्याने आयोजित केल्या होत्या. पंच म्हणून फिडे पंच शार्दुल तपासे, जुईली कुलकर्णी दिपक वायचळ यांनी काम पाहिले तर या स्पर्धा आंतरराष्ट्रीयमास्टर समीर कठमाळे, आंतरराष्ट्रीय मानांकीत खेळाडू जुईली कुलकर्णी, राष्ट्रीय खेळाडू संतोष सपकाळ, प्रशिक्षक गौरी करमरकर, भाऊसाहेबांच्या कन्या विद्या हळदीकर, पुष्पा अेकबोटे, श्रीमती निर्मलाताई कुलकर्णी यांनी पुरस्कृत केल्या होत्या. पारितोषिक वितरण समारंभ चिंतामणी लिमये, प्राचार्य रमेश चराटे, चिदंबर कोटीभास्कर, डॅा. उल्हास माळी, स्मिता केळकर यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.