प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी शहरासह तालुक्यात शनिवारी कोरोनाचा उद्रेक झाला. आटपाडीतील प्रसिद्ध आयसीयू सेंटर मधील 8 लोकांना तर कोरोना केअर सेंटर ची जबाबदारी असणारे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांना कोरोना ची बाधा झाली. दिघंची येथील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरांना ही कोरोनाची लागण झाली आहे. दिवसात एकूण कोरोना बाधितांची संख्या दुपारपर्यंत 18वर पोचल्याने खळबळ माजली आहे.
आटपाडी तालुक्यात कोरोना बाधित यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी ह्या संख्येचा मोठाच स्फोट झाल्याचे दिसून आले. आटपाडी मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या एका प्रसिद्ध आयसीयू सेंटर मधील आठ लोकांना कोरोनाची लागण झाली. तर ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर हे देखील कोरोना पॉझिटिव आले आहेत. तालुक्यातील दिघंची येथील एक प्रसिद्ध महिला डॉक्टर देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्या. तडवळे येथील एकाच घरातील सहा लोक पॉझिटिव आले. या घरातील एकूण बाधितांचे संख्या सात झाली आहे.
मापटेमळा येथील एक आणि पात्रेवाडी येथील एक असे दुपारपर्यंत 18 कोरोना बाधित आढळून आले. तीन दिवसापूर्वी आटपाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. आता पोलीसां पाठोपाठ डॉक्टर देखील कोरोना पॉझिटिव आल्याने आटपाडी तालुक्यात मात्र वातावरण गंभीर बनले आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








