जेष्ठ नागरिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सहारामध्ये अनेकांनी पैसे गुंतविले. मात्र गेल्या बारा वर्षांपासून ती रक्कम परत देण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे आम्ही जेष्ठ नागरिक वृद्धापकाळात विविध समस्यांना तोंड देत आहोत. तेंव्हा सहारामध्ये गुंतवलेली सर्व रक्कम परत द्यावी, अशी मागणी बैलहोंगल तालुक्मयातील गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
सहारामध्ये ठेव तसेच आरडी पद्धतीने रक्कम गुंतविली आहे. कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक नागरिकांनी केली आहे. त्यानंतर या कंपनीमधून येणारे पैसे पूर्ण बंद झाले आहेत. या कंपनीवर न्यायालयीन चौकशी तसेच नियमांबाबत खटले सुरू आहेत. मात्र यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. वास्तविक केंद्र सरकारने गुंतवणूकदारांची रक्कम परत करून त्या कंपनीवर कायद्यानुसार कारवाई करा, आमची काहीच हरकत नाही. मात्र तुमच्या या कारवाईमुळे गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. तेंव्हा याबाबत गांभीर्याने विचार करून सर्वसामान्य जनतेला गुंतवलेली रक्कम परत द्यावी, अशी मागणी होत आहे. यावेळी बैलहोंगल तालुक्मयातील मोठय़ा संख्येने गुंतवणूकदार व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.









