टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव : सुभाष गल्ली-अनगोळ येथील एक महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सावित्री शैलेश रामण्णावर (वय 26) व तिचा सहा वर्षाचा मुलगा श्लोक हे दोघे 21 डिसेंबरच्या सायंकाळी 5 पासून बेपत्ता झाले आहेत. नातेवाईकांच्या वाढदिवसासाठी म्हणून सावित्री ही आपल्या मुलासह घराबाहेर पडली होती. ती अद्याप घरी परतली नाही.
यासंबंधी शैलेश रामण्णावर यांनी 18 जानेवारी रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या माय-लेकांविषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405236 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









