प्रतिनिधी / सातारा
राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्री पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी सोमवारी कराड गाठले. आरोग्यमंत्री टोपे यांनी पाटील यांची चौकशी केल्यानंतर त्यांना उपचारासाठी मंगळवारी सकाळी मुंबईला ब्रीच कॅण्डी रूग्णालयात हलवणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंग, पालकमंत्री पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील, कृष्णाचे डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, बाळासाहोब पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र त्यांन मधुमेह रक्तदाबाचा त्रास असल्याने अधिकची काळजी म्हणून मुंबईला हलवण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रूग्णालयात उपचार होणार आहेत. मंगळवारी सकाळी नऊ वाजता पाटील यांना हलवण्यात येईल. कराडला वाढत असलेल्या रूग्ण संख्येबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन योग्य त्या सुचना दिल्याचेही टोपे यांनी सांगितले.
Previous Articleसोलापूर : वाळू तस्करांची शेतकऱ्यास मारहाण
Next Article मलेशियात आढळला 10 पट अधिक धोकादायक कोरोना विषाणू








