अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 7 ऑक्टोबर 2021, स. 11.00
● शनिवारी रात्री अहवालात 20 बाधित
● एकूण 1,030 जणांची तपासणी
● पॉझिटिव्हिटी दर 1.94 टक्के
● सक्रिय रुग्णसंख्या 410
● गत तीन दिवसात पाचशे लसवंत
● आव्हान पेलून सावरावे लागणार आहे
● आता लसीकरणात मागे राहू नका
सातारा / प्रतिनिधी :
ऑक्टोबर महिन्याचा आरंभ जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक ठरला आहे. सलग सातव्या दिवशी बाधित वाढीचा आलेख पन्नासच्या खाली राहिला असून, सलग तीन दिवस तो 30 वर स्थिर होता. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच्या अहवालापासून तो गेली सलग दोन दिवस 20 वर स्थिर झालेला आहे. शनिवारी रात्रीच्या अहवाल देखील 20 जणांचा अहवाल बाधित आलेला असून, बाधित वाढीचा हा मंदावत चाललेला आलेख जगरहाटीला गती देणारा ठरणार आहे.
शनिवारी अहवालात फक्त 20 बाधित
शनिवारी रात्री प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार एकूण 1,030 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये 20 जणांचा अहवाल बाधित आलेला असून यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 194 एवढा राहिलेला आहे. जर बाधित वाढीचा वेग असाच मंदावत राहिला तर ऑक्टोबर महिन्यातच पॉझिटिव्हिटी दर शून्य टक्के होऊ शकतो. मात्र जगरहाटी सुरू ठेवताना त्यासाठी सर्वांनी नियम पाळणे ही तेवढेच गरजेचे आहे.
आता लसीकरणात मागे राहू नका
जिल्ह्यात सध्या एकूण दिवस घेतलेल्या नागरिकांची संख्या 28 लाख 42 हजार 739 एवढी आहे. यामुळे लसीकरणात जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक असून, मात्र गेल्या पंधरा दिवसात लसीकरणाचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना देखील आणि मोफत मिळत असताना देखील जिल्ह्यातील नागरिकांकडून लसीकरणात प्रतिसाद मिळत नाही. जेव्हा मिळत नव्हती तेव्हा घेण्यासाठी रांगा लागत होत्या. आता शासनाने मोफत लस उपलब्ध करून दिलेली आहे. असे असताना आणि दुसरीकडे कोरोना बाधित वाढीचा आलेख खाली घसरत असताना भविष्यात तिसरी लाट ही जिल्ह्यात येऊ नये, यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
गत तीन दिवसात फक्त पाचशे लसवंत
जिल्हय़ात शासनाकडून लस मोठया प्रमाणावर उपलब्ध आहे. मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. कथा तीन दिवसात फक्त 500 जणांनी लस घेतलेली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 28 लाख 42 हजार 739 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 67 हजार 467 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 74 हजार 672 एवढी झालेली आहे.
आव्हान पेलून सावरावे लागणार आहे
गत दीड वर्षात ज्या पद्धतीने संसर्गाने कहर केला आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केलं आणि ही समाजव्यवस्था ही उध्वस्त होता होता थोडी बजावली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय व्यवसायावर परिणाम झाले परिणामी त्यातून आता सावरत असताना व पुन्हा जगण्याची लढाई सुरू करत असताना कोरोना समवेत त्याच्याशी लढत व काळजी घेत पुढील वाटचाल करावी लागणार आहे. येथे प्रत्येक जीवाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी पुन्हा उभं राहण्याचं आव्हान शिरावर घेऊन ही लढाई सुरूच ठेवावी लागणार आहे. आर्थिक प्रगतीची चक्रे गतिमान करताना प्रत्येकाला रोजगार आणि प्रत्येकाच्या जीवनातील उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील सोडवावा लागणार आहे.
शनिवारी जिल्ह्यात
नमुने-690
बाधित-20
मृत्यू-00
मुक्त-5
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
नमुने-22,43,408
बाधित-2,51,310
मृत्यू-6,443
मुक्त-2,43,732