अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 12 ऑक्टोबर 2021, स. 11.30
● सोमवारी अहवालात फक्त 94 बाधित ● एकूण 4,455 जणांची तपासणी ● कोरोना संसर्गाचा विळखा सैल ● लसीकरण साडे सव्वीस लाखांवर
सातारा / प्रतिनिधी :
संपूर्ण राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा जिल्ह्याला ऑक्टोबर महिन्यात चांगला दिलासा मिळू लागला असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाधीत वाढीचा मंदावत गेलेला वेग आता गेली सलग दोन दिवस 100 च्या खाली राहिलेला आहे. जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाल्याने नवरात्र उत्सवाचा रंग आता आणखी भक्तिमय होऊ लागला आहे.
सोमवारी अहवालात 94 बाधित
रविवारी रात्रीच्या अहवालात बाधित वाढीचा आलेख शंभरच्या खाली घसरला आणि फक्त 73 जणांचा अहवाल बाधित आला होता. त्यानंतर सोमवारच्या रात्री देखील पुन्हा दिलासादायक चित्र समोर आले असून सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ 100 च्या खाली राहिल्याने फक्त 94 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे यामध्ये एकूण 4 हजार 455 जणांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही खाली घसरलेला आहे.
अवेअरनेस, लसीकरण याचा परिणाम
गत सहा महिने कोरोना संसर्गाच्या कहराला तोंड देणाऱ्या सातारा जिल्हावासीयांनी प्रत्येक वेळी प्रशासनात या नियमांचे पालन केले. अपवाद गोष्टी वगळता मास्क, हाताची स्वच्छता, सुरक्षित सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करण्यात आला आणि त्यानंतर आरोग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढवला त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका सध्यातरी टळलेला असून लसीकरणही मोठ्या गतीने सुरू असल्याने लवकरच जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल. सध्या शाळा महाविद्यालय तसेच संपुर्ण जगरहाटी सुरू असली तरी किती नियमांचे पालन करण्याचा चांगला अवेअरनेस सर्वांमध्ये आलेला आहे. पुढील काही दिवस हीच काळजी घेत वाटचाल केल्यास जिल्हा कोरोना मुक्त होऊ शकतो.
तपासण्यांचा वेग झाला कमी
जिल्ह्यात आज पर्यंत 21 लाखाच्या पुढे नागरिकांच्या तोरणा टेस्ट करण्यात आलेले असून त्यामध्ये अडीच लाख नागरिकांचा अहवाल पॉझिटिव आला तर त्यापैकी दोन लाख 41 हजारांच्यावर नागरिक कोरोना मुक्त झालेले आहेत. काही महिने जिल्ह्यात पंधरा-सोळा हजाराच्या आसपास कोरोनाचे टेस्टिंग होत होते. त्यानंतर ते आता कमी कमी होत असून गेल्या तीन-चार दिवसातील आकडे चार ते पाच हजार सहा हजार पर्यंत आहेत. कोरोना टेस्टिंग कमी झालेली असली तरी लसीकरणाचा वाढलेला वेग आणि नियमांचे पालन यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसला असून या संकटाचा विळखा सैल होत असल्याचा दिलासा सध्या लाभलेला आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 21,55,257, एकूण बाधित 2,50,015, एकूण कोरोनामुक्त 2,41,406, एकूण मृत्यू 6,355, उपचारार्थ रुग्ण
सोमवारी जिल्हय़ात बाधित 73, मुक्त 388, मृत्यू 02