मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज पालघरमधून सुरुवात होत आहे. मोदी सरकारच्या कामाची, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याचं पवार यांनी सांगितलं.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी लसीकरणाच्या मुद्दयावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, . केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
यासोबतच जनआशीर्वाद यात्रेविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, यात्रेदरम्यान ग्रामीण भागातल्या लसीकरणाची माहिती घेणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं ही आपली जबाबदारी आहे. कोणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये हाच या जनआशीर्वाद यात्रेचा हेतू असणार आहे, अशी माहिती भारती पवार यांनी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. त्यानुसार जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरूवात आहे. भारती पवार यांची ही जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे जाणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








