प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर महापालिकेची आज, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताची सर्वसाधारण सभा एक वाजल्यानंतर ही सुरु झाली नाही. परिणामी संतापलेल्या काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहातील आयुक्तांची खुर्ची महापौरांच्या दालनात हलवली. त्यामूळे सभागृहात गोंधळ उडाला होता.
कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यानंतर प्रथमच आज, सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात झाली. परंतू सकाळी साडेअकरा ही सर्वसाधारण सभेची वेळ असताना दुपारी 1 वाजल्यानंतर ही सभा सुरु झाली नाही. परिणामी काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे आणि एमआयएमचे रियाज खरादी यांनी सभागृहातील आयुक्तांची खुर्ची उचलून महापौरांच्या दालनात हलवली. अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असताना देखील जाणीवपूर्वक सत्ताधारी आणि महापालिका आयुक्त सभा वेळेवर घेत नाहीत. सभा तहकूब करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
Previous Articleसातारा : माजी सैनिकावरील भ्याड हल्ल्याचा भाजपकडून निषेध
Next Article योशिहिडे सुगा होणार जपानचे पंतप्रधान









