पंजाबमधून सर्वाधिक धान्य खरेदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने चालू व्यापारी वर्ष 2021-22च्या दरम्यान आतापर्यंत 532.86 लाख टन धान्याची खरेदी केली आहे. यामध्ये जास्तीत जास्त खरेदी ही पंजाबमधून करण्यात आली आहे, अशी माहिती पेंद्रीय खाद्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत जवळपास 64.07 लाख शेतकऱयांना एमएसपीच्या रुपाने 1,04,441.45 कोटी रुपयाचा लाभ मिळाला आहे.
चालू व्यापारी सत्रात 9 जानेवारीपर्यंत आतापर्यंत करण्यात आलेल्या एकूण खरेदीमध्ये सर्वाधिक 186.85 लाख टन धान्य हे पंजाब, त्यापाठोपाठ 67.65 लाख टन छत्तीसगढ, 65.54 लाख टन तेलंगाणातून 55.30 लाख टन तसेच हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून 46.50 लाख टन धान्य खरेदी केले असल्याची माहिती आहे.
धान्य विपणनचे सत्र
विपणन सत्र 2020-21 च्या दरम्यान, सरकारने 1,69,133.26 कोटी रुपयाच्या एमएसपीमूल्यावर 895.83 लाख टन धान्य खरेदी केली होती. सरकार भारतीय खाद्य निगमसोबत राज्यांमधील एजन्सींच्या मदतीने ही खरेदी केली जाते.









