पंढरपूर / ऑनलाईन टीम
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला हल्लाबोल चढवाल आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे. कोरोनाच्या काळात सभा घेण्याची वेळ आली नसती तर बरं झालं असतं. परंतू पोट निवडणूक लागली. राष्ट्रवादीचे नेते आले आणि मुक्ताफळं उधळून गेली, म्हणून आम्हाला यावं लागलं. आतापर्यंत शक्ती विभागली होती पण आता ती एकवटली असल्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय.
पंधरा वर्षांत एक पैसा दिला नाही, आता देऊ-देऊ म्हणून सांगत आहेत. गरीबांचे मिटर कट करुन पाच पाच हजार रुपये गोळा केले. हे सरकार तयार झालं तेव्हा महाविकास आघाडी म्हणून ओळखळं जात होतं. पण आता ते महावसुली आघाडी सरकार म्हणून ओळखलं जातंय. सरकारमध्ये आले तेव्हा बांधावर जावून सांगायचे ५० हजार देऊ. पण २ हजार रुपयेही दिले नाहीत. कर्जमाफी करु म्हणले, पण कोणतीही कर्जमाफी केली नाही. शेतमालाला एफआरपी फक्त मोदी सरकारमुळे मिळतेय. हजारो रुपयांचे पॅकेज मोदी सरकारनं दिले. मोदी सरकार शेतकऱ्यांची चिंता करतंय. या भागात ५ हजार कोटी रुपयांची कामं सुरु आहेत. ती पूर्ण झाल्यावर कनेक्टिव्हिटी मिळेल, मोठी बाजारपेठ निर्माण होईल. समाधान आवताडेंना निवडून द्या, ३५ गावांसाठी मोदींकडून पैसे आणून देतो, असा दावाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








