आचरा /प्रतिनिधी-
जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी मालवण तालुक्यातील चिंदर येथील समीर लब्दे यांना आचरा विभागप्रमुखपदी नियुक्ती दिली आहे. सोमवारी मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांनी मालवण शिवसेना कार्यालय येथे समीर लब्दे यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, अनिल गावकर, किरण वाळके, भाई गोवेकर, किसन मांजरेकर यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.









