वृत्तसंस्था/ बेंगळूर
रविवारी येथे झालेल्या पुरुषांच्या विश्व व्हॉलिबॉल क्लबस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या जपानच्या सनटरी सनबर्ड्स क्लबने कांस्यपदक पटकाविले.
कांस्यपदकासाठीच्या झालेल्या सामन्यात सनटरी सनबर्ड्सने तुर्कीच्या हॉकबँक कुलुबू क्लबचा 3-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. सनटरी क्लबने हा सामना 17-25, 23-25, 25-21, 25-19, 15-12 अशा गुणांनी जिंकत तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक मिळविले.









