वाळपई प्रतिनिधी :
सत्तरी तालुक्मयात कोवीड रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज वाळपई क्षेत्रातील एका वाडय़ावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे सध्यातरी कोरोना रोगाने वाळपईच्या शहरात शिरकाव केलेला आहे सध्या सत्तरी तालुक्मयात एकूण रुग्ण संख्या 27 झाली असून वाळपई शहरात सापडलेल्या रुग्णामुळे शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात खळबळ निर्माण झालेली आहे. आज सापडलेला रुग्ण हा पेशाने पोलीस असून तो वास्को मांगुर याठिकाणी कामाला आहे .
यामुळे आरोग्य खात्याची यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली असून वाळपई सामाजिक रुग्णालयाच्या सर्व परिसरामध्ये आज निर्जंतुकीकरण करण्यात आले.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील प्रमुख बाजारपेठ म्हणून समजल्या जाणाऱया वाळपई शहरांमध्ये कोरोना रोगाने प्रवेश केलेला आहे.वाळपईच्या भागात असलेल्या चिंचमळ भागांमध्ये एक पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह म्हणून आढळून आलेला आहे. सदर रुग्ण काल वाळपई सामाजिक रुग्णालयात तपासणीसाठी आला असता त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालेले आहे. यामुळे त्याच्या घरातील सर्व कुटुंबाचे रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केलेले आहे.
त्याच त्याचप्रमाणे तो वाळपई सामाजिक रुग्णालयात तपासण्यासाठी गेल्यामुळे सदर रुग्णालयाची संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे.
एकूण प्राप्त माहितीनुसार सदर रुग्ण गेल्या तीन-चार दिवसांपासून वाळपई शहराच्या अनेक ठिकाणी फिरला असून यामुळे वाळपई भागामध्ये भागांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे.
यासंदर्भातील खबरदारी म्हणून अनेक नागरिकांनी स्वतः आपली तपासणी करण्यावर भर दिला असून त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत येणार असल्याचे समजते.
मोर्ले अंजुणे भागातील आरोग्य कर्मचारी पोझीटिव्ह.
मोर्ले पंचायत क्षेत्रातील घोडेमळ याठिकाणी आतापर्यंत 21 सापडल्यामुळे त्याठिकाणी गेल्या दहा दिवसापूर्वी कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे. सदर वाडय़ावरील सर्वांची तपासणी करण्यात आली असून 21 रुग्ण वगळता इतर कोणीही पॉझिटिव्ह नसल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे या dव्डाय़ाच्या शेजारी असलेल्या देऊळवाडा व कासारवाडा भागातील नागरिकांची संपूर्णपणे तपासणी करण्यात आलेली आहे. आज अंजुणे याठिकाणी आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्यामुळे साखळी सामाजिक व रुग्णालयाच्या पथकाने जवळपास 160 जणांची तपासणी केली असून यासंदर्भात अहवाल शुक्रवारी संध्याकाळपर्यंत येण्याची शक्मयता आहे.









