ऑनलाईन टीम
गेल्या काही काळापासून राजस्थान काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. सचिन पायलट यांचा गट मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज असून ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतात, असे कयास बांधले जात आहेत. अशातच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए पी अब्दुल्लाकट्टी यांनी सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पायलट यांच्या पक्षांतराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सचिन पायलट चांगले नेते आहेत. आगामी काळात लवकरच सचिन पायलट काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असे अब्दुल्लाकट्टी म्हणाले. भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या प्रदेश कार्यसमितीच्या एका बैठकीला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ए पी अब्दुल्लाकट्टी उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
दरम्यान, राजस्थान भाजपमध्येही सर्व काही अलबेल दिसत नाही. भाजपमधील वसुंधराराजे गट केंद्रीय नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा असून बंडखोरीच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसमधील अंतर्गत कलह गेल्या वर्षभरापासून चव्हाट्यावर आला आहे. सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांचा तो प्लान यशस्वी झाला नाही. तेव्हापासूनच पायलट गटाच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. विशेष म्हणजे या चर्चा पायलट यांनी फेटाळून लावल्या होत्या. तसेच त्यांनी पेट्रोल दरवाढीवरून आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









