ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यविषयक कॅबिनेट समितीने या कालावधीत पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे. तसेच अधिवेशनापूर्वी खासदारांना कोरोना लसीचे दोन डोस घेण्याची सूचना केली आहे. संसद सत्राच्या कार्यकाळात संसद परिसरात कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, असेही या समितीने म्हटले आहे.