ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाचे कामकाज आजपासून सुरू होणार आहे. संयुक्त सचिव आणि त्यांचे अधिकारी या कार्यालयातून काम पाहतील. तसेच इतर अधिकारी आळीपाळीने कामावर येतील, सरकारने त्याबाबतचा आदेश जारी केला आहे.
दोन्ही सभागृहाच्या सचिवालयाचे कामकाज सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच चालणार आहे.कोरोनामुळे करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज 24 मार्चपासून अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आले होते. लोकसभेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 एप्रिल रोजी संपुष्टात येणार होते. मात्र, निर्धारित वेळेपूर्वीच हे कामकाज स्थगित करण्यात आले होते.








