प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात वन विभागाला आलेल्या संयुक्त वन समितीच्या निधीत भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी `प्रादेशिक’चे उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शिवसेनेच्या निवेदनात संयुक्त वन समितीच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. संयुक्त वन समिती निधी हा वनीकरण, वनसंवर्धन, जलसंधारण, संरक्षण, वनोपजीवीवर खर्च केला जातो. पण जिल्ह्यात वन समितीला डावलून हा निधी खर्च झाला आहे.
कडगाव, पाटगावसह जिल्ह्यात अन्य तालुक्यांत जीइं&एमद्वारे खरेदी केलेल्या साहित्याची मुळ बिले आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रिंटर, बॅटरी खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. वन समित्या फक्त कागदावरच आहेत. त्यामुळे गत आर्थिक वर्षात केलेल्या खरेदीचे स्वतंत्र ऑडीट करावे, त्यातून दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, निधी खर्चाचा वार्षिक आराखडा फलक लावावा, अशा मागण्या केल्या आहेत.