प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिक्षाचालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सोमवारी रत्नागिरी शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल़ी
सुहास विष्णू साळवी (45, ऱा कुर्ली रत्नागिरी) व राजेश विश्वनाथ तोडणकर (42, ऱा कुर्ली रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हे सोमवारी दुपारी रिक्षा (एमएच 08 टीसी 793) घेवून रत्नागिरी शहरात येत होते. यावेळी भाटय़े चेकपोस्ट येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांची रिक्षा थांबवल़ी संशयित आरोपींनी रिक्षा अडवल्याच्या रागातून पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरूवात केल़ी तसेच सार्वजनिक शांततेचा भंग केला व संचारबंदीचेही उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला आह़े शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अजिंक्य पवार यांनी तक्रार दाखल केली होत़ी पुढील तपास हेडकॉन्स्टेबल झोरे करत आहेत़









