प्राधिकरणाच्या बैठकीत विकासकामासंदर्भात चर्चा
प्रतिनिधी /खानापूर
नंदगड येथे संगोळ्ळी रायण्णा समाधी व फाशी स्थळाच्या विकासासाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सोमवारी बेंगळूर येथे झालेल्या संगोळ्ळी रायण्णा प्राधिकरणाच्या बैठकीत बोलताना दिली.
बैठकीला मुख्यमंत्री येडियुराप्पांसह जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, महसूल मंत्री आर. अशोक, खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगीसह प्राधिकरणाचे इतर सदस्य उपस्थित होते.
यापूर्वी काँग्रेस राजवटीत तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संगोळी रायण्णा समाधी व फाशीस्थळ परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रु. चे अनुदान मंजूर केले होते. त्यामधून विकासकामालाही गतीने सुरुवात झाली होती. पण गेली दीड वर्षे सदर काम रखडले आहे. यामुळे त्या कामासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी बैठकीत आमदार अंजली निंबाळकर यांनी केली









