कोलंबो
श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अलीकडच्या काळामध्ये वाढल्या असल्याचे दिसून आले आहे. देशामध्ये महागाईची सुरुवात झाली असल्याचे सांगितले जात आहे. एकंदर वाढलेल्या महागाईने येथील जनता हैराण झाली असल्याचे जाणकार सांगत आहेत. बेकरी संघटनेकडून श्रीलंकेमध्ये ब्रेडसह इतर बेकरी वस्तूंच्या किमती साधारण 10 ते 30 टक्के इतक्या वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे गव्हाचे पीठही महागले आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही तेल उत्पादक संघटनांनी वाढवल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. या सगळय़ा वाढीची झळ रोज लागणाऱया वस्तूंच्या किमतीवर दिसली आहे. दुसरीकडे विमानाच्या तिकिटाच्या किमतीही अंदाजे 27 टक्क्यांपर्यंत वाढल्या असल्याचे तेथील हवाई उड्डाण विभागाने म्हटले आहे. त्यामुळे या देशातून अन्य देशात प्रवास करण्यासाठी स्थानिक प्रवाशांना जादा रक्कमेची तरतूद करावी लागणार आहे.









