नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशमधील आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने नुकतीच अटक केली. दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोव्हेंबर 2021 मध्ये एजन्सीने नोंदवलेल्या ‘वोजीडब्ल्यू’ नेटवर्क प्रकरणासंदर्भात नेगी यांना अटक करण्यात आली आहे. जवळपास वर्षभर ते एजन्सीच्या रडारवर होते. लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या हुर्रियत दहशतवादी निधी प्रकरणाच्या चौकशीसाठी अरविंद नेगी यांना 2017 मध्ये शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.









