गोळीबारात सुरक्षा कर्मचारी जखमी
श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला. या चकमकीत एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुप्तचर विभागाकडून शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिह्यातील हेफ शिरमल भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. यावेळी सतर्क असलेल्या लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिल्याने चकमक सुरू झाली. गोळीबारात सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला, तर एका अज्ञात दहतशवाद्याला गोळय़ा घालून ठार करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱयाने दिली.









