जुनेबेळगाव येथे म्हैस पळविण्याची शर्यत
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गणेशपेठ जुनेबेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या म्हैस पळविण्याच्या शर्यतीत शैलेश लंगोटे, कलमेश्वर प्रसन्न हिंडलगा, सुजल जांगळे या स्पर्धकांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
सदर स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सतिश खन्नूकर, मंगेश पवार, जयंत जाधव, बंडू सामजी, जितेंद्र चौगुले, जोतिबा भोसले यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
निकाल पुढीलप्रमाणे- रेडकू लहान गट (अनुक्रमे दहा विजेते)- शैलेश लंगोटे, भरत धनवार कॅम्प, कुशल गावडे कॅम्प, विश्वनाथ तवनोजी, मोहित मजगाव, विश्वनाथ तवनोजी, भरत घसारी, मंथन औसेकर कोनवाळ गल्ली, रामलिंग प्रसन्न तुरमुरी. मोठा गट (अनुक्रमे 10 विजेते)- कलमेश्वर प्रसन्न हिंडलगा, महेश देसूरकर बेनकनहळ्ळी, शद्वार धामणेकर गणेशपूर, तन्विर मिरजकर आनंदवाडी, सागर नंद्याळकर मंडोळी, काळभैरव प्रसन्न चव्हाट गल्ली, मंगाई प्रसन्न वडगाव, जोतिबा तवनोजी गांधीनगर, निलेश चौगुले गांधीनगर, प्रवीण भातकांडे हिंडलगा,
सहा महिने आतील गट (पहिले 10 विजेते)- सुजल जांगळे, संतोष लंगोटी कॅम्प, उमेश निलजकर काकती, भैरवनाथ प्रसन्न हलगा, सोनिया गवळी शिंदोळी, श्री मंगाई देवी प्रसन्न (पिंटू मरवे), सचिन पवार, कुलदीप कोचेरी काकती, लक्ष्मण गौंडाडकर, प्रवीण पाटील बी. के. यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महादेव वाळके, संदीप पाटील, विजय सोमनाचे, महेश पाटील, अनिल खन्नूकर, समित चौगुले, भूषण होसूरकर, शुभम हंडे, सौरभ मुरकुटे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन व आभार संतोष शिवनगेकर यांनी केले. यावेळी गावातील व गल्लीतील पंचमंडळी उपस्थित होती.









