विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा उग्र आंदोलन उभारणार
प्रतिनिधी /वाळपई
तीन मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले शेळ मळावली ग्रामस्थांचे आंदोलन निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आलेले आर्हें मात्र निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी सुद्धा उग्र आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली या ठिकाणी होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या आंदोलनावेळी अनेकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत त्याचप्रमाणे आयआयटी प्रकल्पाच्या नावावर करण्यात आलेली जमीन सरकारने त्वरित मागे घ्यावी व पंचायत संचालनालयात सुरू असलेले वाद सरकारने मागे घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्या होत्या.
मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केलेली आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही व कायद्याचे पालन व्हावे या दृष्टिकोनातून सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे. शशिकांत सावर्डेकर यांनी सांगितले की, सदर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आलेले आहे. मात्र सदर आंदोलन निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जोमाने हाती घेण्यात येणार आहे. जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा शशिकांत सावर्डेकर व इतरांनी दिलेला आहे.
दरम्यान आंदोलनाच्यावेळी शिष्टमंडळाने भाजपाला मतदान करू नका असे आवाहन केलेले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदार खरोखरच भाजपच्या विरोधात जाऊन मतदान करणार का असा सवाल निर्माण झालेले आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो मात्र जोपर्यंत दाखल केलेले गुन्हे व इतर स्वरूपाच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत गप्प बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.









