शेतवडीतील रस्त्यांसाठी लाखोचा निधी खर्च : शेतकऱयांतून समाधान : अजूनही काही रस्त्यांचे काम सुरूच
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुका सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सध्या उद्योग खात्री योजनेतून निधी मंजूर करून शेतातील रस्ते करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱयांची पायवाट आता सोपी होताना दिसत आहे. अनेक रस्ते या योजनेतून करण्यात आले आहेत. तर अजूनही बरेचसे रस्ते करण्यात आले नाहीत. मात्र तेही लवकरच करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात येणार आहेत. सध्या लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारकडून उद्योग खात्री योजनेसाठी मोठय़ा प्रमाणात प्रोत्साहनही देण्यात येत आहे. मात्र खर्च केलेल्या निधीचा योग्य वापर झाला आहे का? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या तालुक्मयातील विविध मतदारसंघांमध्ये शेती रस्त्यांसाठी उद्योग खात्री योजनेतून लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे शिवारातील रस्त्यांची अवस्था आता सुस्थितीत झाली आहे.
2016-17 सालामध्ये रस्त्यांसाठी 2 कोटी 39 लाख 78 हजार रुपये खर्च करण्यात आले होते. 2017-18 सालाकरिताही कोटय़वधी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले तर 2020-21 मध्येही लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे यावषी अधिक प्रमाणात काम झाले नसल्याचे दिसून येत आहे. बेळगाव तालुक्मयाने आपले उद्दिष्ट पूर्ण करून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
मध्यंतरी काम योग्यरित्या न झाल्याने हे रस्ते पुन्हा आहे त्या स्थितीतच आहेत, अशा तक्रारी ऐकावयास येत होत्या. शिवारात ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते असतील तर शेतकऱयांना वाहतूक करणेही तितकेच सोपे होते. त्या दृष्टिकोनातूनच या कामांना गती देण्यात आली आहे. अजूनही बऱयाच ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट असली तरी ती तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
देशाचा विकास व्हायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. शेतकऱयांच्या विकासामधील एक भाग म्हणजे शिवारातील रस्त्यांवर अधिक भर देण्यात येत आहे. तब्बल 100 रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याची उद्योग खात्री योजनेत नोंद असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मध्यंतरी बेळगाव येथे उद्योग खात्री योजनेतून भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र आता तालुक्मयातील तलाव, रस्ते आणि इतर बरीचशी कामे उद्योग खात्री योजनेतून करण्यात येत आहेत. विशेष करून विहिरी खोदाईमुळे अनेक शेतकऱयांना याचा लाभ मिळाला आहे.
तालुक्मयातील तब्बल 5 हजारांहून अधिक नागरिक उद्योग खात्री योजनेतून काम करत आहेत. अनेक रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने समाधानही व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्मयातील अनेक शेतवडीतील रस्ते दर्जेदार झाल्याने नागरिकांबरोबरच शेतकऱयांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वर्षभरात सर्व रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार
बेळगाव तालुक्मयातील अनेक रस्त्यांना उद्योग खात्रीची जोड देण्यात आली आहे. विशेष करून शेतवडीत जाणाऱया रस्त्यांसाठी आपले मोठे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात शेतवडीत जाण्यासाठी शेतकऱयांना त्रास होणार नाही यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. येत्या वर्षभरात आपण सर्व रस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मल्लिकार्जुन कलादगी म्हणाले.
-ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी









