प्रतिनिधी/ बेळगाव
सुळगा (हिंडलगा) येथील एका मेंढपाळाचा तलावात पडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी कुवेंपुनगरजवळील बॉक्साईट रोडनजीक ही घटना घडली असून जेवणानंतर हात धुवून घेताना तोल जाऊन हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
विठ्ठल रायाप्पा अनगोळकर (वय 32) रा. सुळगा (हिं.) असे या दुर्दैवी मेंढपाळाचे नाव आहे. तो बकरी चारण्यासाठी गेला होता. दुपारी जेवणानंतर तलावात हात धुवून घेताना तोल जाऊन तो पाण्यात पडला. बचावासाठी त्याने एकच आरडाओरडा केला. लोक धावून येईपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









