कोल्हापूर / प्रतिनिधी
“सुख आणि समृद्धी आणणारे हे कायदे खूप दुःखाने मागे घ्यावे लागले आहेत सरकारपुढे कोणताही पर्याय नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे कायदे मागे घ्यावे लागले. सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कायदे मान्य होते, मात्र काही गटाला हे कायदे मान्य नव्हते त्यामुळे अतिशय दुःखाने हे कायदे मागे घेतले गेले आहेत.” केंद्र सरकारकडून मागे घेतल्या गेलेल्या कृषी कायद्याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला व्यक्तिशः खूप दुःख झाले आहे कॉन्ट्रॅक्ट शेती हे आधीपासूनच महाराष्ट्रात सुरू आहे पण या देशात चांगले जरी असले तरी त्याला विरोध होत असतो मोदींना विरोध म्हणून चांगल्या गोष्टींना विरोध केला जातोय. शेतकऱ्यांना समजावून पुन्हा हे कायदे आणले पाहिजे या कायद्यावर महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी होते, त्यांना कायदे पटले होते केवळ काही विशिष्ट वर्ग याला विरोध करतात, पण मोदींचं मन मोठं आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.