वार्ताहर / शिये
नागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनांचे काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या कामासाठी शिये ते केर्ले या भागातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे शासनाने या भागातील रेखांकनाचे काम शेवटच्या टप्प्यात गेल्या तीन दिवसांपासून पोलिस बंदोबस्तात सुरू आहे. गुरुवारी शियेगावच्या हद्दीत रेखांकनाचे काम सुरू असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतू कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून शिरोली एमआयडीसी पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटेतच आडवून ताब्यात घेतले.
यामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.माणिक शिंदे, उत्तम पाटील, परशराम शिंदे, मानसिंग पाटील, व के.बी.खुटाळे यांचा समावेश आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.यावेळी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









