युवराज्ञी, युवराजांच्या हस्ते केक कापून शुभेच्छा – पुरवणी प्रकाशन सोहळा उत्साहात
प्रतिनिधी/ सातारा
सातारा-जावलीचे दमदार नेतृत्व असलेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस हा दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी आनंद पर्वणीच असतो. शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मान्यवरांची राजधानीत हजेरी लागत असते. मात्र, गेल्यावर्षी व यावर्षी देखील कोराना स्थितीमुळे त्यांच्या वाढदिनी सातारकरांसह सर्वांच्या आनंदाला मर्यादा आल्या. मात्र, ’तरुण भारत’ च्या कार्यालयात शिवेंद्रराजेंच्या वाढदिनाचा आनंद ओसंडून वाहिला.
जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे लोकांची गर्दी होऊ नये म्हणून वाढदिनी साताऱयात नव्हते. त्यामुळे आपल्या बाहुबलीशिवाय साऱया नेत्यांसह कार्यकर्ते बेचैन होते. अखेर ’तरुण भारत’च्या पुरवणीला दरवर्षीप्रमाणे यंदाही मिळालेल्या उदंड पसंतीसोबतच ’तरुण भारत’चे कार्यालय या साऱयांसाठी आनंदाच्या उधाणाचे केंद्र बनले.
शिवेंद्रसिंहराजे व वेदांतिकाराजे भोसले यांच्या सुकन्या युवराज्ञा रुणालीराजे आणि सुपुत्र युवराज रुद्रनीलराजे भोसले यांच्या हस्ते केक कापून या जल्लोषाला मोकळीक करून देण्यात आली. यावेळी ’तरुण भारत’चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी सर्वांचे आभार मानले.
तर यावेळी शिवेंद्रसिंहराजेंचे निकटवर्तीय राजुभय्या भोसले, जयेंद्र चव्हाण, फिरोज पठाण, अशोक मोने, ऍड. विक्रमपापा पवार, अविनाश कदम, अमोल मोहिते, ओंकार भंडारे तसेच ’तरुण भारत’ चे जाहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, महेश साळवी, विजय जाधव उपस्थित होते.









