ऑनलाईन टीम / नांदेड :
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सुरळीत चालले असताना भाजप पुन्हा सत्ता स्थापनेबाबत आशावादी असल्याचे दिसत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तसं वक्तव्य केले आहे.
‘शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे,’ असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नांदेडमध्यश एका विवाहसोहळय़ाला मुनगंटीवार उपस्थित राहिले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
ते म्हणाले, शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए, सुबह का भुला श्याम को आया, असं आम्ही समजू. तसेच मनसेला सोबत घेण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









