कणकवली / वार्ताहर:
कणकवली तालुका शिवसेनेची बैठक येथील कार्यालयात पार नुकतीच पडली. बैठकीत शिवसेना कणकवली आयोजित नवरात्रोत्सव २०२१ ची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी राजू शेटये तर खजिनदारपदी राजू राणे यांची निवड करण्यात आली.
बैठक आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत पार पडली श. उत्सव मंडळाच्या सदस्यपदी शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, अनिल हळदिवे, सुशांत नाईक, हर्षद गावडे, भालचंद्र दळवी , सचिन सावंत , राजू राठोड, प्रदीप मसुरकर, सुदाम चव्हाण, सुदाम तेली, भास्कर राणे, रुपेश आमडोसकर, बाळू पारकर, तेजस राणे, नीलम सावंत – पालव, स्नेहा तेंडोलकर यांची निवड करण्यात आली.
Previous Articleशिवराज्य ब्रिगेड सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुनील पारकर
Next Article सुदेश आचरेकर यांची सामाजिक बांधिलकी









