महाराष्ट्रात पूर आला आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त करून गेला. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना अन्नधान्य पुरविण्यासाठी शिवप्रतिष्ठान कार्य करीत आहे. शिवप्रति÷ान बेळगावतर्फे जमा करण्यात आलेले जीवनावश्यक साहित्य शनिवारी दुपारी चिपळूणला रवाना झाले. घरोघरी जावून शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते पूरग्रस्तांना मदत करणार आहेत.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱया शिवप्रति÷ानने यावेळीही पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. अनसूरकर गल्ली येथील छत्रे वाडय़ात यासाठी संकलन केंद्र सुरू करण्यात आले. नागरिकांनी आपल्याला शक्मय तितकी रक्कम, साहित्य या केंद्रात जमा केले. बेळगावकरांना केलेल्या आवाहनानुसार भरभरून मदत जमा झाली. ही मदत शनिवारी दोन ट्रकमधून चिपळूणला पाठविण्यात आली. वासुदेवशास्त्राr छत्रे गुरुजी व जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते ट्रकचे व साहित्याचे पूजन करण्यात आले.
बेळगावकरांकडून अपेक्षेपेक्षा जास्त मदत जमा
यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले, शिवप्रति÷ानने दिलेल्या एका हाकेवर बेळगावमधील दानशूर व्यक्तींनी अपेक्षेपेक्षा जास्त मदत जमा केली. जीवनावश्यक वस्तू, धान्य पूरग्रस्तांना पाठविण्यात येत आहे. बेळगावमधील नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. छत्रे गुरुजींनी शिवप्रति÷ानच्या या कार्याचे कौतुक करून यापुढेही असेच सामाजिक कार्य करावे, असे सांगितले.
400 किटचे होणार वाटप
एका कुटुंबाला किमान 15 ते 20 दिवस पुरेल इतक्या साहित्याचे किट तयार करण्यात आले आहेत. कडधान्य, गृहोपयोगी साहित्य, बेडशीट, कपडे यांचाही यामध्ये समावेश आहे. 400 किट तयार करण्यात आले असून ते नागरिकांना वाटले जाणार आहेत. शिवप्रति÷ानचे रत्नागिरी येथील 40 कार्यकर्ते साहित्य वाटपाचे काम करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी शहर प्रमुख अजित जाधव, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, विभागप्रमुख पुंडलिक चक्हाण, अनंत चौगुले, अंकुश केसरकर, नामदेव पिसे, सचिन चोपडे, हिरामणी मुचंडीकर, सांगली येथील धारकरी शेखर जगताप यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









