प्रतिनिधी / शिरोळ
येथील एक विवाहित महिला व १९ वर्षांची तरुणी बेपत्ता झाली असल्याची वर्दी शिरोळ पोलिसात दाखल करण्यात आली याबाबत पोलिसातुन मिळालेली माहिती अशी की येथील सौ राजश्री राहुल भोसले वय वर्षे ३० या रागाच्या भरात रविवारी दि. १९ रोजी दुपारी कोणासही काहीही न सांगता निघून गेली असल्याची वर्दी तिचा पती राहुल प्रकाश भोसले यांने दिली आहे.
तर रमाबाई आंबेडकर सोसायटी येथील १९ वर्षांची तरुणी कुरुंदवाड येथे मैत्रिणीस मेहंदी काढून येते असे सांगून शनिवारी अठरा रोजी दुपारी गेली आहे तिचा सर्वत्र शोधाशोध घेतले असता ते मिळून न आल्याने तिच्या आईने आपली मुलगी बेपत्ता झाली असल्याची वर्दी दिली आहे सदर बेपत्ता दोन्हीचा तपास हवालदार डी डी सानप हे करीत आहेत.