प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ येथील जुन्या भारतीय स्टेट बँकेजवळ असलेला रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून सध्या ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने एखादा मोठा अपघात घडल्यानंतर रस्ता दुरुस्त करणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
शिरोळ जयसिंगपुर कुरुंदवाड हा मुख्य मार्ग आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पुणे मुंबई सातारा या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने दत्त दर्शनासाठी येत असतात. दत्त कारखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वार ते जनता हायस्कूल पर्यंत नऊ ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. तहसील कार्यालय पंचायत समिती पोलीस स्टेशन या ठिकाणी नेहमीच वाहनाची वर्दळ असते पंचायत समितीकडून तहसिलदाराकडे रस्ता पास करण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक बसविणे तसेच तहशिल कार्यालय, पद्माराजे विद्यालय, अर्जुन वाडी रोड, घालवाड फाटा, जनता हायस्कूल ,नांदणी रोड व आगरभाग रोडवर गतिरोधक बसवण्याची मागणी वारंवार करू न ही सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे.
सध्या दत्त कारखाना चा गळीत हंगाम सुरू असून सागर भाग ते शिरोळ या दोन किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावर शासकीय आयटीआय असून बिरोबा माळ समतानगर विजयसिंग नगर गणेश नगर मळा भाग आहे. बैलगाडीतूनही ऊस वाहतूक सुरू आहे. कर्कशा हॉर्नचा आवाज बरोबर टेपरेकॉर्डर लावून जाणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जय भवानी चौकातून हे एकेरी वाहतूक काढूनही सर्वच दोन चाकी चार चाकी वाहन धारक एकेरी वाहतूक नियमन करीत आहेत या ठिकाणी कायमस्वरूपी ट्राफिक पोलीस नेमावा अशी मागणी जोर धरू लागली या ठिकाणी गतिरोधक ट्राफिक पोलीस त्वरित नेमल्यास उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा अनेक तरुण मंडळांनी दिला आहे.









