शिरोळ / प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेसेचया विविध विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडी मंगळवार दि 22 रोजी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता व्ही सी द्वारे आयोजित करण्यात आले आहे सदर निवडीच्या नोटीसाही सदस्यांना लागू करण्यात आलेल्या आहेत
शिरोळ नगर परिषदेमध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता आहे 25 नोव्हेंबर 19 रोजी या नगरपरिषदेच्या स्थायी समिती व विषय समित्यांच्या निवडी करण्यात आल्या होत्या सदर सभापतींचा कार्यकाळ 24 नोव्हेंबर 2020 साली समाप्त झालेला दरम्यानच्या काळात पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती त्यामुळे या निवडी लावण्यात आल्या होत्या
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सदर विषय समितीच्या सभापती व स्थायी समितीच्या सभापती निवड करण्याचे आदेश दिले आहेत मंगळवार 22 रोजी सकाळी 11 ते 1 वाजते पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे तीन ते तीन तीस पर्यंत अर्जाची छाननी करणे दुपारी चार वाजता विविध विषय समितीच्या सदस्य व सभापतीची निवड जाहीर करणे सदर निवडीची सभा ही व्ही सी द्वारे आयोजित करण्यात आली आहे







