प्रतिनिधी / कोल्हापूर
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील 75 वर्षीय वृद्धा आणि गडहिंग्लज येथील 58 वर्षीय पुरूषाचा गुरूवारी कोरोनाने मृत्यू झाला. या दोन बळींमुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 39 झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यत 34 झाली आहे.
दुपारी 3 वाजता आलेल्या 16 पॉझिटिव्ह रूग्णांत इचलकरंजीतील 5, करवीर तालुक्यातील 5, पन्हाळा तालुक्यातील 3, राधानगरी, कागल, चंदगड तालुक्यातील प्रत्येकी 1 आहे. कागलमधील 34 वर्षीय महिला, चंदगडमधील 44 वर्षीय पुरूष, राधानगरीतील 21 वर्षीय तरूण, इचलकरंजी येथील 58 वर्षीय पुरूष, 43 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील 25 वर्षीय तरूण, 27 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय महिला आणि 42 वर्षीय पुरूष, पन्हाळा तालुक्यातील 36 वर्षीय पुरूष, 43 वर्षीय पुरूष, 27 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.