शिराळा / वार्ताहर
अंतरी खुर्द तालुका शिराळा येथील 42 वर्षीय पुरुष मुंबई येथून दिनांक 17 रोजी आला आहे. या व्यक्तीची मुंबई येथे स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रूग्णाला प्राप्त झाला व जिल्हा प्रशासनाला आज रोजी प्राप्त झाला असून तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरची व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची खात्री करून घेतली आहे. या व्यक्तीला मिरज येथे आयसोलेशन कक्षात आणण्यात येत असून या व्यक्तीची मिरज कोविड लॅब येथे पुनश्च स्वॅब घेऊन खात्री करण्यात येणार आहे.
तसेच निकटवर्तीयांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व अनुषंगिक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.








