प्रतिनिधी/ कागवाड
कागवाड येथील शिरगुप्पी शुगर वर्क्स साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामातील प्रतिटन उसाला 2700 रुपयेची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार कलप्पण्णा मगेण्णवर यांनी केला. शनिवारी साखर कारखान्याच्या सभा भवन मध्ये पत्रकार बैठक आयोजित केले होते. या बैठकीमध्ये यंदाचा सन 2020-21 या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱयांना प्रतिटन उसाला 2700 रुपये घोषणा कलप्पण्णा मगेण्णवर यांनी केला. यंदाच्या गळीत हंगामातील सोळा दिवसात 65,000 टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. या शेतकऱयांच्या खात्यावर येत्या 2-4 दिवसात ही रक्कम जमा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. गेल्यावषी महाराष्ट्रात कोसळलेल्या अधिक पावसामुळे कृष्णा नदीला महापूर येऊन लाखो टन ऊस पाण्यात बुडून नाश झाले होते. अशा उसाचे आमच्या साखर कारखान्याने घोषणा करून 2700 रुपये दर दिला आहे. तोही पहिल्यांदा आमच्याच कारखान्याने दराची घोषणा केले होते. याहीवषी आपल्याच कारखाने पहिल्यांदाच दराची घोषणा केली आहे. आपण आमदार होऊन शेतकऱयांची सेवा केलेले व आजपर्यंत करत असलेले सेवेचे फळ आपल्याला शेतकऱयाकडून मिळत आहे. जो विश्वास आपल्यावर ठेवला आहे असंच विश्वास निरंतर असू दे व यंदाचा अधिक रिकवरीचा ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असेही कलप्पण्णा मगेण्णवर यांनी शेतकऱयांना आवाहन केले आहे. कारखान्यात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत, निरंतर कोरोना काळात सेवा बजावलेल्या पत्रकार, तसेच कौतुक मगेण्णवर, पदराची घोषणा केलेले कलप्पण्णा मगेण्णवर यांचा अधिकारी अरुण फरांडे व इतरांनी सन्मान केला. यंदाचा दर घोषणा करण्यापूर्वी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर रमेश दोड्डण्णवर, पृथ्वी दोड्डण्णवर, प्रवीण दोड्डण्णवर, व इतर संचालक अधिकाऱयाशी चर्चा करून दर घोषणा केल्याचे माहिती कलप्पण्णा मगेण्णवर यांनी दिला. या कार्यक्रमात साखर कारखान्याचे केन मॅनेजर ए.के.पाटील, कौतुक मगेण्णवर, बी.डी.यळगुड, लखन गौडा, सह आदींची उपस्थिती होती.









