पोलिसांकडून पैशांची मागणी, वाहनधारक संतप्त : वरिष्ठ पोलिसांनी लक्ष घालण्याची आवश्यकता
प्रतिनिधी / बेळगाव
कोविडच्या तपासणीसाठी शिनोळी फाटय़ावर उभारलेल्या चेकपोस्टवरील पोलिसांकडून मनमानी कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांची अडवणूक करून विनाकारण त्रास दिला जात आहे. तर काही वाहनधारकांकडून पैशांची मागणी देखील केली जात आहे. त्यामुळे शिनोळी फाटय़ावरील चेकपोस्टकडे वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी लक्ष देवून संबंधितांना समज द्यावी, अशी मागणी प्रवाशांसह वाहनधारकांतून होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान सीमाहद्दीवरील राकसकोप, शिनोळी, अतिवाड, चलवेनहट्टी आदी ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. याठिकाणी आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांची अडवणूक करून चौकशी केली जात आहे. मात्र शिनोळी येथील चेकपोस्ट नाक्मयावर दुचाकी, चारचाकी आणि वडाप वाहनधारकांची विनाकारण अडवणूक केली जात आहे. प्रवाशांनी दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा मोबाईलवरील संदेश दाखविल्यानंतर देखील पोलीस नागरिकांवर अरेरावी करत आहेत. शिवाय महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवासी व वाहनधारकांकडून पैशांची मागणी होत आहे. त्यामुळे या चेकपोस्टवरील पोलिसांना समज द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर सीमाहद्दीवर शिथिलता देण्यात आली आहे. मात्र शिनोळी येथील चेकपोस्ट नाक्मयावर वाहनधारकांची विनाकारण अडवणूक करून त्रास दिला जात आहे. सर्रास नागरिकांचे दोन डोस झाले आहेत. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात येत असली तरी पोलीस वाहनधारकांवर दादागिरी करत असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया उमट
आहेत.
चंदगड तालुक्मयातून बेळगावला येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र चेकपोस्टवर अडवणूक केली जात असल्याने प्रवाशांना काहीवेळेला माघारी परतावे लागत आहे. दरम्यान सर्व वाहनधारकांची विनाकारण अडवणूक केली जात असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होवून गेंधळ होत आहे.