वार्ताहर / कणकुंबी
कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ खानापूर यांची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये जांबोटी येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अंजलीन फर्नांडिस या पश्चिम भागातून भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. त्याबद्दल जांबोटी, कणकुंबी आणि बैलूर केंद्रांच्यावतीने त्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
जांबोटी येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक महेश कुंभार होते. यावेळी दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बैलूर शाळेचे मुख्याध्यापक मादार यांनी स्वागत केले. जांबोटी शाळेच्या शिक्षिका अंजलीन फर्नांडिस यांच्या निवडीबद्दल तिन्ही केंद्रांतील शिक्षकवर्गांकडून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जांबोटी ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्या अनुराधा नागराज सडेकर, मयुरी मारुती सुतार यांचा देखील जांबोटी शाळा सुधारणा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जांबोटी सीआरपी रमेश गावडे, कणकुंबी सीआरपी पी. ए. माळी, एसडीएमसी सदस्य मिलिंद डांगे, विजय कोटीभास्कर, श्रीपाद गुंजीकर, उमेश हळदणकर, दर्शन नाईक, राजू देसाई, राजू कांबळे व महिला सदस्या तसेच जांबोटी, बैलूर व कणकुंबी केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. यावेळी जांबोटी शाळेच्या शिक्षिका माधुरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आमटे शाळेचे मुख्याध्यापक धामणेकर यांनी आभार मानले.









