वार्ताहर/ शिखरशिंगणापूर
वैशाख अमावस्या शुक्रवार रोजी शिखर शिंगणापूर येथे शैनेश्वर जयंती साजरी करण्यात आली प्रथा आणि परंपरे प्रमाणे यावर्षी ही शिंगणापूर मध्ये शैनेश्वर जयंती साजरी करण्यात आली मात्र कोरोना जागतिक महामारी लवकर नष्ट व्हावी हीच प्रार्थना करण्यात आली
कोरोना पार्श्वभूमीवर सध्या सर्व बंद आहे त्यामुळे साध्या पद्धती ने सोशल डिस्टन्सन पाळून शैनेश्वर जयंती येथील ब्रम्हवृंदानी साजरी केली श्री अरुण काका व श्री प्रसाद गुरुजी यांनी विश्वशांती संकल्प करून होम,हवन,जप,यज्ञ प्रयोग साजरा केला यावेळी शनिदेव आणि शनिग्रह याबाबत विवेचन करण्यात आले शनी हा न्यायप्रिय,लोखंड, तेल उधोगा चा कारक आहे त्यामुळे शनी बद्दल कोणतीही अंधश्रद्धा अथवा भीती बाळगू नये असे विवेचन करण्यात आले
या वर्षी महाआरती ऐवजी सध्या पद्धतीने पण उत्साहात शैनेश्वर जयंती साजरी करण्यात आली प्रसाद,आरतीने सांगता केली








