प्रतिनिधी / शाहुवाडी
शाहुवाडी तालुका शिवसेना यांच्या वतीने चिनी वस्तूं यापुढे वापरू नये याचा निषेध करून चिनी वस्तूंची मलकापूर येथे होळी करण्यात आली होळी.मलकापूर येथील विठ्ठल मंदिर नजीक शाहूवाडी शिवसेना तालुका यांच्या वतीने विविध चिनी वस्तूंची होळी करून चीनचा निषेध करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार म्हणाले की आज चिन भारत देशात विक्री होणाऱ्या वस्तू मधून मिळणाऱ्या पैशाचा वापर चिन सैन्यासाठी करत असून भारतात घुसखोरी करत आहे यापुढे शहरातील व्यापारी बंधूंनी ही दक्षता घेऊन चिनी वस्तू विक्रीस ठेवू नये व ग्राहकांनी चिनी वस्तू घेऊ नये असे आवाहण ही करण्यात आले.
यावेळी मलकापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका माया पाटील, दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी नगरसेविका शालन सोनवळे, बाजीराव गायकवाड ,बाबू सोनवळे , राहुल पवार,तेजस बेंडके ,अमोल नागवेकर, आदींच्या सह शिवसैनिक उपस्थित होते.