प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठवडय़ात झालेल्या परतीच्या पावसाने शहर व परिसरात घरांची पडझड झाली आहे. शाहुनगर पहिला मुख्य तिसरा क्रॉस येथील कल्लाप्पा गुंडू गौंडाडकर यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
कल्लाप्पा गौंडाडकर यांच्या कौलारू घराची भिंत कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. राहते घर कोसळल्यामुळे त्या कुटुंबाचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या कुटुंबाने केली आहे..









