ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शाहीन बाग हा मोहल्ला नाही, तो भुगोलाचाही भाग नाही. तो एक विचार असून, तुकडे-तुकडे गँग आणि मोदी विरोधकांचा अड्डा आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.
एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रवीशंकर प्रसाद म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा कुणाचाही नागरिकत्वाचा अधिकार हिसकावून घेणार नाही. तरी देखील त्याला देशभरातून विरोध होत आहे. या कायद्याला विरोध का होत आहे, हे आजवर कोणी सांगू शकले नाही. निरागस मुलांनाही पंतप्रधान मोदींच्या विरोधात भडकावले जात आहे.
तसेच दिल्लीतील शाहीन मोहल्ला हे कोणतेही ठिकाण नाही. तो एक विचार आहे. भारताचा ध्वज आणि भारताच्या संविधानाचे कव्हर आहे. तिथे भारताचे तुकडे करणाऱयांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. तुकडे-तुकडे गँग आणि मोदी विरोधकांचा हा अड्डा आहे, असा आरोपही रवीशंकर प्रसाद यांनी केले आहे.









