करण जोहरच्या पार्टीचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला अहवाल
प्रतिनिधी/ मुंबई
सुशांत सिंह राजपूत मफत्यू प्रकरणात एकिकडे सीबीआयने सुशांतच कुटुंबियांची पुन्हा चौकशी करण्यास सुरुवात केली असतानाच, दुसरीकडे या तपासाला वेग दिलेल्या एनसीबीने याप्रकरणी बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खान आणि चित्रपट निर्माता करण जोहरला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. बॉलिवुडचा किंग खान देखील ड्रग्ज घेत असल्याची माहिती अटक केलेल्या क्षितीज प्रसादच्या चौकशीतुन समोर आल्याने, तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
तर 2019 साली करण जोहरने आयोजीत केलेल्या पार्टीचा संपूर्न व्हिडीओ मिळाल्यानंतर तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविला होता. त्यानुसार, त्याचा अहवाल मिळाला असुन, या पार्टीतील व्हिडीओशी कोणतीही छेडछाड न होता या व्हिडीओत ड्रग्ज घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने, एनसीबीकडे एक प्रकरे भक्कम पुरावा ]िमळाला आहे. त्यानंतर डीजी एनसीबी राकेश अस्थाना यांच्यासोबत डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा, जोनल हेड समीर वानखेडे आणि डीडीजी मूथा अशोक जैन या अधिकाऱयांची आणखी एक बैठक होऊ शकते. ज्यामध्ये 2019मध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओ संदर्भात करण जोहरची चौकशी करायची की, नाही यासंदर्भात निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी तपास करताना रविवारी करण जोहर गोव्याहून मुंबईत दाखल झाला. तर दुसरीकडे क्षितीज प्रसादच्या चौकशीत अनेकदा शाहरुख खानचे देखील नाव समोर आले आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये क्षितीज प्रसाद हे फक्त एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसरच नाही तर एक मोठे नाव आहे. क्षितिज प्रसाद यांनी धर्मा प्रोडक्शनच्या आधी बालाजी टेलिफिल्मस, शाहरूख खानची रेड चिलीज आणि जॉन अब्राहम प्रोडक्शन हाऊससाठीही काम करत होता. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. क्षितीज प्रकाशला जेव्हा एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या घरातून गांजाही सापडला होता. त्याचप्रमाणे, अभिनेत्री शर्लिन चोप्राने काही गंभीर आरोप ही लावले होते. शर्लिनचा दावा आहे की ’आयपीएलची टीम कोलकाता नाइट रायडर्सच्या पार्टीत क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेत होत्या तर बॉलिवूडचा किंग खान सुद्धा ड्रग्सचे सेवन करतात‘ हा खळबळजनक दावा शर्लिन चोप्राने केला. क्षितिज प्रसाद हा आधी शाहरुख खानच्या मालकीच्या असलेल्या रेड चिलीजमध्ये सुद्धा होता. त्यामुळे क्षितीजकडून फक्त धर्मा प्रोडक्शनचे नाही तर रेड चिलीज बद्दल सुद्धा माहिती एनसीबीला मिळाली आहे. यामुळे येणाऱया काळात शाहरुख खान, करण जोहरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न एनसीबी करणार हे निश्चित.
सुशांतसिंग प्रकरणी एनसीबी लवकरच दाखल करणार आरोपपत्र
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मफत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करीत असलेल्या तपासाला आता अधिक वेग आला आहे. एनसीबी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे. शिवाय आणखी अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे. एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांची एनसीबीच्या अधिकाऱयांसह बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीमला या प्रकरणात कारवाई पुढे नेण्यास सांगितली आहे. जवळपास पाच तास ही बैठक झाली. यानंतर राकेश अस्थाना यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱया टीमला सहा महिन्यांत चार्जशीट दाखल करण्यास सांगितले आहे.
अभिनेत्रींच्या बँक खात्याची होणार चौकशी
दरम्यान, याप्रकरणी चौकशी केलेल्या अभिनेत्री दिपीका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपुर, रकुलप्रीत यांचे मोबाईल फोन जप्त केले असुन, आवश्यकता भासल्यास यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या बँक खात्याची गेल्या तीन वर्षातील ट्रान्झेक्शन तसेच इतर व्यवहारांची चौकशी करण्यास एनसीबीने सुरुवात केली आहे.








