सावंतवाडी/ प्रतिनिधी-
शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचे जीआर निघत आहेत तसेच विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना नुकसान भरपाई व आधी बाबत मलमशासन जीआर काढत आहेत हे बदललेल्या जीआर ची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोचायला हवी त्यासाठी महसूलचे अधिकारी कर्मचारी अलर्ट असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला शासनाच्या आलेले नवीन जीआर त्याची इत्थंभूत माहिती आणि योग्य पद्धतीने माहिती गावागावात पोहोचवा आणि त्याचा लाभ कसा जास्तीत जास्त लोकांना पोहोचेल यादष्टीने प्रयत्न करा असे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात स्पष्ट केले.
सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे व त्यांच्या सर्व तलाठी व सर्कल यांचे काम कोरोना महामारी पासून ते आता पूरस्थिती पर्यंत उत्कृष्ट आहे सावंतवाडी तालुक्यात महसूल विभाग लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे अशा शब्दात खांडेकर यांनी कौतुक केले. सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयात सावंतवाडी तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमी कार्यरत असणारे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा विशेष गौरव या वेळी करण्यात आला. तसेच सर्कल व तलाठी व तहसीलदार कार्यालयातील काही महिला कर्मचारी शिपाई हे चांगले काम करत आहेत त्यांचाही प्रमाणपत्र व व पुष्पा गुच्छ देऊन खांडेकर यांनी गौरव केला. त्यावेळी खांडेकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या महसूल विभागात सावंतवाडी महसूल विभागाचे काम चांगले आहे, कोरोना महामारीतही आपण सर्वांनी चांगले काम केले आहे, आता शासनाच्या माध्यमातून रोज नवीन नवीन जीआर निघत आहेत त्यामुळे या नवीन नवीन जीआर यांचे माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जीआर निघाले त्याची संपूर्ण माहिती लोकांना असते त्यातून काहीजण गैरसमज व समाज निर्माण होऊ शकतो त्यामुळे योग्य पद्धतीत निघालेला जीआर ची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि त्यातून त्यांना लाभही मिळवून द्या. ज्यांनी या वर्षभरात चांगले काम केले तसे काम यापुढे करा. आणि सर्वांनी लोकांच्या हिताच्या दृष्टीने शासनाच्या योजना गावागावात घराघरात पोचवा आणि महसूल विभागाचे नाव उज्वल करा असे ते म्हणाले.