प्रतिनिधी/ सातारा
जिल्हयात दीड महिन्यांपूर्वी लसीकरणास आरंभ झाल्यानंतर प्रंटवर्कर्सचे लसीकरण पूर्ण झाल्यावर ज्येष्ठांसाठी लसीकरण सुरु झाले. लसीबाबत गैरसमज असल्याने लोक लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते. मात्र लस सुरक्षित असल्याचे समोर आल्यावर लसीकरणासाठी प्रचंड गर्दीही होवू लागली. एप्रिल महिन्यात लसीकरणाचा चांगला वेग होता. आरोग्य विभाग देखील उपचार व लसीकरण अशा दोन्ही पातळीवर लढा देत असताना मे महिन्याच्या आरंभापासून लस पुरवठा होत लोकांना लस घ्यायची आहे पण शासनानेच लसीकरणाचा बोजवारा उडवून टाकलाय. सध्या कोव्हिशिल्ड लसीचा अल्प मारा सुरु आहे तर जिल्हय़ात कोव्हॅक्सिनच उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र आहे.
प्रारंभी प्रंटवर्कर, नंतर ज्येष्ठ, त्यानंतर 45 वयोगटाच्या वरील लस देण्याचे काम सुरु करण्यात आले. तोपर्यंतच 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मे महिन्याच्या आरंभापासून सुरु करण्यात आलेय. मात्र, जिल्हय़ाला शासनाकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने गेल्या आठवडाभरात लसीकरणाचा पुरता बोजवारा उडून गेलाय. सध्या दिवसभरात कसेतरी एक हजाराच्या पटीत लसीकरण सुरु असून तेवढाच पुरवठा शासनाकडून होत आहे.
शुक्रवारी जिल्हय़ात फक्त 1 हजार 323 जण लसीकरणाचे लाभार्थी ठरले असून त्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात येत आहे. त्यामुळे आजपर्यंत पहिला डोस घेणाऱयांची संख्या 5 लाख 41 हजार 349 झाली असून दुसरा डोस घेणाऱयांची संख्या 87 हजार 764 एवढी अशी एकूण मिळून जिल्हय़ातील 6 लाख 29 हजार 113 जण लसीकरणाचे लाभार्थी ठरलेले आहेत.
खासगी लसीकरण बंदच
जिल्हय़ात काही ठिकाणी खासगी हॉस्पिटलमध्ये 250 रुपये शुल्क आकारुन लसीकरण सुरु करण्यात आले होते. मात्र, आता खासगी लसीकरण केंद्रावर देखील लस उपलब्ध नाही. तिथे अनेक लोक लस घेण्यासाठी जात आहेत. मात्र, खासगी लसीकरण केंद्रांना आरोग्य विभागाने वरुनच कमी लस येत असल्याने पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे खासगी लसीकरण बंद असून सरकारी केंद्रांवर सुरु असलेले लसीकरण धिम्या गतीने उपलब्ध साठयानुसार सुरु आहे. खासगी लसीकरण केंद्र चालवणाऱया हॉस्पिटल्संना तुम्हीच थेट कंपनीकडून लस मागवा, असे सांगण्यात येत असून यात आर्थिक वा तांत्रिक अडचणी पण त्यावर शासनाने उपाय काढण्याची गरज आहे.
मुदत संपूनही अनेकांना दुसरा डोस नाही
ज्यांनी एक महिन्यापूर्वी कोव्हिशिल्ड घेतली तर काहींनी कोव्हॅक्सिन लस घेतली यातील अनेकांच्या मुदती संपून गेल्यात मात्र त्यांना लसीचा दुसरा डोस मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेकजण दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जात आहेत. मात्र, त्यांना चुकून कोव्हिशिल्डचा डोस असेल तर मिळत आहे. कोव्हॅक्सिन लस सध्या जिल्हाला उपलब्ध झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.








