रत्नागिरी / प्रतिनिधी
गुरुवारी रात्री आलेल्या 27 पॉझिटिव्ह तपासणी अहवालात रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील एक भूलतज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.
या तपासणी अहवालात एकूण 27 जण पॉझिटिव्ह आले असून यात परकार हॉस्पिटल मधील 7 कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच आणखीन दोन स्टाफ नर्स चा यामध्ये समावेश आहे. दिवसेंदिवस शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची संख्या वाढत असून जिल्ह्यासाठी ही चिंताजनक बाब आहे.









