डिसेंबरच्या दुसऱया आठवडय़ापासून शाळा सुरू होणार?
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात शाळा सुरू करण्याबाबत सरकार सोमवारी हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार डिसेंबरच्या दुसऱया आठवडय़ापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करेल, असे समजते. सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्त अनुबकुमार यांनी यापूर्वीच अनेक बैठका घेतल्या आहेत. दरम्यान, शिक्षण खात्याचे अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी, खासगी शाळा, एसडीएमसी अध्यक्ष, पालकांशी विविध विषयांवर चर्चा करीत माहिती संग्रह करून शाळा सुरू करण्याबाबत अहवाल तयार केला आहे. प्रारंभी माध्यमिक शाळा सुरू करण्याला संमती मिळाली आहे, असे समजते.
नववी ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास समाज कल्याण खात्याने अनुमती दिली असून आपल्या व्याप्तितील वसतिगृहे सुरू करण्यास संमती दिल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्याबाबत आरोग्य खात्याने अनेक सल्ला-सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिक्षण खाते शाळा सुरू करण्याबाबत अधिकृतपणे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.









